शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असणाऱ्या देशाच्या माजी शिक्षण सचिव, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या संस्थापक मुख्य संयोजक डॉ.कुमुद बंसल यांच्या प्रेरणादायी स्मृती जपाव्यात म्हणून "डॉ.कुमुद बंसल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार" देण्याचा निर्णय यशवंतराव चव्हाण सेंटरने घेतला आहे.

अधिक माहितीसाठी डाॅ.माधव सूर्यवंशी - 9967546498 आणि योगेश कुदळे - 9850122713 यांच्याशी संपर्क करावा.

निकष यादी -
१) ज्या शिक्षकांना राज्य, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशा शिक्षकांना या पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
२) शिक्षकाला किमान १० वर्षे अध्यापनाचा अनुभव असावा.
३) कमाल वयोमर्यादा ५५ असावी.
४) अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
५) इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
६) कोणत्याही माध्यमाच्या शिक्षकाला यात सहभागी करून घेता येईल.
७) प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकाचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही.
८) सर्व प्रकारच्या उदा. जि.प.,खाजगी अनुदानित, विनानुदानित, एक शिक्षकी, दोन शिक्षकी, शासकीय आदिवासी (भटक्या-विमुक्त)आश्रमशाळा यातील सर्व शिक्षकांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल. ९) पुरस्कारासाठी स्वत: शिक्षकांने कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही अर्थात स्वतःची शिफारस स्वतः कोणत्याही शिक्षकानी करू नये. मात्र नामांकन मिळालेल्या शिक्षकाने मुलाखत देणे, शाळा दाखवणे या बाबी आवश्यक आहेत.
१०) एक पुरूष शिक्षक, एक महिला शिक्षिका असे दोन राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.
११) पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रूपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.
१२) निवड करताना संबंधित शिक्षकाची शाळेतील उपस्थिती, उपक्रमातील सहभाग, त्याचा विद्यार्थ्यांवर झालेला परिणाम, विद्यार्थीप्रिय कामे, पालकांचा प्रतिसाद आदी बाबींची नोंद घेतली जाईल.
१३) निवड समितीवर कोणताही दबाव आणू नये. त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबतीत गोपनीयता बाळगण्याची जबाबदारी शिक्षकांची असेल.
१४) ज्या मान्यवरांनी, संस्थानी अशा शिक्षकांचे काम प्रत्यक्ष पाहिले आहे, त्यांचे नामांकन करण्यासाठी खालील नंबरवर आपले नाव व मोबाईल नंबर पाठवावेत. त्यानंतर एक गुगल लिंक दिली जाईल, ती भरून पाठवावी.