- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: यशस्विनी साहित्य सन्मान
मुंबई विद्यापीठातून एम.ए. चे उच्च शिक्षण पूर्ण करून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 'सहाय्यक महाव्यवस्थापक' या जबाबदार पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ. सुनंदा भोसेकर! प्रशासनातील कठोर शिस्त आणि वाङ्मयीन क्षेत्रातील उत्तुंग निष्ठा यांचा एक अत्यंत देखणा अन् सुरेख संगम त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासात पाहायला मिळतो.
'अनोळखी प्रदेशात', 'रे गोपाळा' आणि 'गळ्यावरचा निळा डाग' यांसारख्या संवेदनशील काव्यसंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी मराठी काव्यविश्व समृद्ध केले; तर परकीय प्रवाशांच्या नजरेतून प्राचीन भारताचा वेध घेणारा 'पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान' हा ऐतिहासिक २ खंडांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ रचून त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. तमिळ, इंग्रजी आणि हिंदी साहित्याचा मराठीत अनुवाद करत जागतिक विचारविश्वाला जोडणारा सेतू बांधणाऱ्या सौ. भोसेकर यांनी 'लोकमत', 'सकाळ' आणि 'प्रहार'मधील आपल्या अभ्यासू स्तंभलेखनातून वाचकांना सदैव वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले आहे.
ऐतिहासिक संशोधन, नाट्यलेखन, आकाशवाणीवरील प्रसिद्ध 'चिंतन' हे प्रबोधनात्मक सत्र आणि 'ऐलतटावर-पैलताटावर' मालिकेच्या माध्यमातून साठोत्तरी साहित्याचा घेतलेला सखोल आढावा… या सर्वच माध्यमांतून त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी अविरत अन् अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना बहिणाबाई, आरती प्रभू आणि मधुकाका कुलकर्णी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
संयमी व्यक्तिमत्व असलेल्या अष्टपैलू साहित्यिका आणि अभ्यासू संशोधक सुनंदा भोसेकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “'यशस्विनी सन्मान पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: यशस्विनी उद्योजिका सन्मान
चिपळूणच्या भूमीत रुजलेलं, इंग्रजी साहित्यात पदवी घेऊन IAS-IFS होण्याचं उत्तुंग स्वप्न पाहणारं एक ध्येयवादी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राची जागुष्टे-महाजन! परंतु, नियतीच्या मनात या कर्तृत्ववान प्रवासासाठी काहीतरी वेगळाच आराखडा होता. अनपेक्षितपणे औद्योगिक क्षेत्रात प्रवेश झाला आणि सेंद्रिय शेतकऱ्यांच्या सहवासापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे एका महाकाय उद्योगविश्वात रूपांतरित झाला. २००५ मध्ये रसायनांच्या उत्पादनात पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्या तीक्ष्ण दूरदृष्टीला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली; केवळ उत्पादन विकणं पुरेसं नाही, तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन १००% गुणवत्तेची हमी देणं गरजेचं आहे. याच क्रांतीकारी विचारातून २००७ मध्ये जन्म झाला... 'ऑर्नेट लिक्विड केमिकल्स अँड फ्लोरिंग्स प्रायव्हेट लिमिटेड'चा!
मुंबईतील ऐतिहासिक 'द इम्पीरियल' टॉवरपासून सुरू झालेली ही यशस्वी घोडदौड BKC मधील कॉर्पोरेट संकुले पार करत वेगाने सुरु आहे. 'लोढा - द पार्क' मधील ८६ एकरांवर पसरलेले आशियातील सर्वात मोठे कार पार्किंग असो, दिल्ली आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ असो, की थेट आफ्रिकेतील काँगोच्या 'किन्शासा आंतरराष्ट्रीय विमानतळावर' भारतीय कौशल्याचा आणि गुणवत्तेचा ठसा उमटवणं असो... ऑर्नेटने प्रत्येक प्रकल्पात गुणवत्तेचा एक नवा आणि सर्वोच्च मानदंड प्रस्थापित केला!
२६५ हून अधिक यशस्वी प्रकल्प, २ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त चौरस फूट क्षेत्रावर दिमाखात सजलेले फ्लोअरिंग, २५० हून अधिक कुटुंबांच्या आयुष्याला दिलेला रोजगाराचा आधार आणि २३ कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल! मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू ते थेट हैदराबादपर्यंत आज ऑर्नेटच्या गुणवत्तेचा आणि विश्वासाचा दणदणीत ठसा उमटला आहे.
बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रासारख्या आव्हानात्मक विश्वात आपल्या अतुलनीय कौशल्याने, जिद्दीने आणि कर्तृत्वाच्या बळावर महिला नेतृत्वाचा एक नवा आणि सुवर्ण अध्याय लिहिणाऱ्या यशस्वी उद्योजिका श्रीमती प्राची जागुष्टे-महाजन यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “'यशस्विनी सन्मान पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
मुंबई विद्यापीठातून एम.ए. चे उच्च शिक्षण पूर्ण करून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 'सहाय्यक महाव्यवस्थापक' या जबाबदार पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ. सुनंदा भोसेकर! प्रशासनातील कठोर शिस्त आणि वाङ्मयीन क्षेत्रातील उत्तुंग निष्ठा यांचा एक अत्यंत देखणा अन् सुरेख संगम त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासात पाहायला मिळतो.
'अनोळखी प्रदेशात', 'रे गोपाळा' आणि 'गळ्यावरचा निळा डाग' यांसारख्या संवेदनशील काव्यसंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी मराठी काव्यविश्व समृद्ध केले; तर परकीय प्रवाशांच्या नजरेतून प्राचीन भारताचा वेध घेणारा 'पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान' हा ऐतिहासिक २ खंडांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ रचून त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. तमिळ, इंग्रजी आणि हिंदी साहित्याचा मराठीत अनुवाद करत जागतिक विचारविश्वाला जोडणारा सेतू बांधणाऱ्या सौ. भोसेकर यांनी 'लोकमत', 'सकाळ' आणि 'प्रहार'मधील आपल्या अभ्यासू स्तंभलेखनातून वाचकांना सदैव वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले आहे.
ऐतिहासिक संशोधन, नाट्यलेखन, आकाशवाणीवरील प्रसिद्ध 'चिंतन' हे प्रबोधनात्मक सत्र आणि 'ऐलतटावर-पैलताटावर' मालिकेच्या माध्यमातून साठोत्तरी साहित्याचा घेतलेला सखोल आढावा… या सर्वच माध्यमांतून त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी अविरत अन् अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना बहिणाबाई, आरती प्रभू आणि मधुकाका कुलकर्णी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
संयमी व्यक्तिमत्व असलेल्या अष्टपैलू साहित्यिका आणि अभ्यासू संशोधक सुनंदा भोसेकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “'यशस्विनी सन्मान पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: यशस्विनी कृषी सन्मान
एकाच म्हशीच्या दुधावर चालणाऱ्या संसाराला सोबत घेऊन जगणाऱ्या या स्त्रीची कहाणी केवळ संघर्षाची नाही, तर अशक्य गोष्ट शक्य करणाऱ्या जिद्दीची आहे! ती स्त्री म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील अंदूर गावच्या वैशाली बाळासाहेब घुगे…! २००६ मध्ये 'स्वयं शिक्षण प्रयोग' या संस्थेशी त्या जोडल्या गेल्या आणि त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. आपल्यातील नेतृत्वगुण आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर २०१४ मध्ये त्यांनी 'यशदा'मधून विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. पाहता पाहता त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी 'स्टेट ट्रेनर' बनल्या आणि हजारो महिला लोकप्रतिनिधींसाठी एक सक्षम मार्गदर्शक म्हणून उदयास आल्या.
वैशालीताईंचा एकच ठाम विश्वास होता, 'निसर्गाशी जुळवून घेतलेली शेती हीच खरी प्रगती!' याच विचारातून त्यांनी केवळ १० गुंठे जमिनीमध्ये सेंद्रिय शेतीचा एक क्रांतिकारक प्रयोग उभा केला. सेंद्रिय पद्धती, गांडूळ खत निर्मिती, अझोला चारा तंत्रज्ञान आणि गावरान पोल्ट्रीचा असा काही नेटका मेळ घातला, की या अवघ्या १० गुंठ्यांच्या तुकड्याने सर्वांचे डोळे दीपवून टाकले. निसर्गाचे भान राखून केलेल्या या शास्त्रीय शेतीतून आज त्या वर्षाला तब्बल १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत!
पण वैशालीताईंचा हा प्रवास केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता मर्यादित राहिला नाही. मग तो भीषण दुष्काळ असो किंवा कोरोनाचा कठीण काळ... त्यांनी संकटालाच संधी बनवत हजारो महिलांना रोजगाराचे भक्कम साधन निर्माण करून दिले. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या नामांकित 'वेध' मंचापासून ते महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांपर्यंत पोहोचून त्यांनी सेंद्रिय शेतीची आणि महिला सक्षमीकरणाची एक नवी क्रांती घडवून आणली!
मातीशी घट्ट नाळ जोडून पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या, पारंपरिक शेतीला नवसंजीवनी देणाऱ्या आणि हजारो महिलांच्या अंधारमय आयुष्यात आशेची प्रकाशज्योत उजळणाऱ्या वैशाली बाळासाहेब घुगे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “'यशस्विनी सन्मान पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी पुण्याच्या ऐतिहासिक 'महाराष्ट्रीय मंडळातून' सुरू झालेला हा प्रवास आज भारतीय क्रीडा विश्वात अत्यंत अभिमानाने गाजत आहे. सलग २० राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व करत, १९७६ ते १९८२ या काळात सलग ७ वर्षे महाराष्ट्राला राष्ट्रीय चॅम्पियन बनवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा राहिला, अशा क्रीडामहर्षी म्हणजे सविता श्रीराम मराठे! १९७९, १९८० आणि १९८१ अशी सलग तीन वर्षे देशाचे 'राष्ट्रीय विजेतेपद' स्वतःकडे राखणाऱ्या, १९८२ च्या दिल्ली 'एशियन गेम्स'मध्ये भारतीय तिरंग्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने' सन्मानित झालेल्या सविताताईंनी खेळाडू म्हणून क्रीडापटलावर सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले.
एक अव्वल खेळाडू म्हणून इतिहास घडवल्यानंतर, १९९१ सालापासून त्यांनी द्रोणाचार्यांच्या भूमिकेतून एक नवा अध्याय सुरू केला. ज्या महाराष्ट्रीय मंडळात त्या घडल्या, त्याच मंडळातून त्यांनी ७० हून अधिक राज्यस्तरीय, ३० हून अधिक राष्ट्रीय आणि ५ आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण केले. वर्ल्ड कप, एशियन चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्स यांसारख्या भव्य व्यासपीठांवर देशाचा झेंडा फडकवणारे मल्ल त्यांनी घडवले, तसेच स्वतः ३ शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू देशाला दिले. या अतुलनीय योगदानासाठी त्यांना 'जिजामाता पुरस्काराने' गौरवण्यात आले. एवढेच नव्हे, तर २००३ पासून आंतरराष्ट्रीय पंच म्हणून वर्ल्ड कप, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी अत्यंत निष्पक्ष व निःस्पृह न्यायदान केले आहे.
'बँक ऑफ महाराष्ट्र'सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून सन्मानपूर्वक निवृत्त झाल्यावरही, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या कोषाध्यक्ष म्हणून त्यांची क्रीडासेवा आजही अविरत सुरू आहे. एक अव्वल खेळाडू, मार्गदर्शक द्रोणाचार्य आणि जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पंच अशा तिहेरी भूमिकेतून महाराष्ट्रातील जिम्नॅस्टिक्स समृद्ध करणाऱ्या क्रीडारत्न सविता मराठे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “'यशस्विनी सन्मान पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.