यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांची ३३ वी पुण्यतिथी विवीध उपक्रमांनी साजरी स्व यशवंतराव चव्हाण यांचे विचार तरूण पिढाला ज्ञात व्हावेत तसेच स्व यशवंतराव चव्हाण  साहेबांचे साहित्य,संस्कृती,शिक्षण,समाजकारण ,संरक्षण या क्षेत्रातील योगदानातून महाराष्ट्राने जी घोडदौड केली तसेच स्व यशवंतराव चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र उभा करण्याचे काम ग्रामीण भागात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई विभागीय केंद्र अहमदनगरच्या माध्यमातून सुरू आहे आज २५ नोव्हेंबर २०१७ रोजी स्व यशवंतराव चव्हाण साहेबांची ३३ वी पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच  यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - अहमदनगर