दि.२ (औरंगाबाद) : महाराष्ट्रात आता गणेशोत्सवाची चाहूल लागलेली आहे,पुढील आठवड्यापासून गणपती उत्सव राज्यभरात साजरा व्हायला सुरुवात होईल.मागील दोन वर्षांपासून कोविड निर्बंधांचे पालन करीत गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा होत आहे.पण पुढील काळात साध्या पद्धतीबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला कसा साजरा करता येईल ? गणेश मूर्ती पासून सजावटीच्या सामानापर्यंत आपल्या त्यांच्या निवडीमध्ये पर्यावरणाचे भान कसे राखता येईल ? या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

औरंगाबाद येथील दिपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्षा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नरत असलेल्या पर्यावरणप्रेमी मनीषा चौधरी उपरोक्त विषयावर ऑनलाईन संवाद साधणार आहेत.शनिवार दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होईल.प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून (www.facebook.com/ycp100) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,सल्लागार नंदकिशोर कागलीवाल, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,सदस्य डॉ.भालचंद्र कांगो,प्रा.अजीत दळवी,डॉ.श्रीरंग देशपांडे,डॉ.अपर्णा कक्कड,दासू वैद्य,डॉ.मुस्तजीब खान,डॉ.रेखा शेळके,विजय कान्हेकर,सुहास तेंडुलकर,सुनील किर्दक,रेणुका कड,सुबोध जाधव आदींनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद