मराठवाड्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील बारा वर्षांपासून अविरत कार्य करणार्‍या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त मा. अंकुशराव कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मागील बारा वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळणारे प्रसिद्ध उद्योजक मा. नंदकिशोर कागलीवाल यांच्या विनंतीवरून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांनी दि. 8 सप्टेंबर 2017 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विभागीय केंद्राच्या नवीन कार्यकारिणीची नियुक्ती केलेली आहे.

केंद्राच्या विभागीय कोषाध्यक्षपदी सचिन मुळे यांची फेरनियुक्ती करण्यात आलेली असून, नीलेश राऊत यांची केंद्राच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
औरंगाबाद विभागीय केंद्राच्या कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारूकी, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नंदकिशोर कागलीवाल, आ. राजेश टोपे व मुकुंद भोगले हे या केंद्राचे सल्लागार असणार आहेत. नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या विभागीय संघटकपदी सुबोध जाधव तर महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या विभागीय समन्वयकपदी रेणुका कड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नवनियुक्त कार्यकारिणीचे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मा. खा. सुप्रिया सुळे, उपाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, सचिव श. गं. काळे, खजिनदार आ. हेमंत टकले, कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद