यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान व प्रयोग मालाड यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्मिन्गो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात नऊ ठिकाणी लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यापैकी चौथी कार्यशाळा आज दिनांक २८ सप्टेंबर २०१७ रोजी एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय,औरंगाबाद येथे यशस्वीरित्या पार पडली. प्रसिद्ध समीक्षक,लेखक-दिग्दर्शक अशोक राणे,प्रसिद्ध दिग्दर्शक शिव कदम यांनी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत लघुपटांची आवड असलेले १२४ कलाकार व विद्यार्थी सहभागी झालेले होते. या कार्यशाळेत ‘लघुपट’ म्हणजे नेमकं काय, लघुपट निर्मितीची इतर अंगे या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लघुपट म्हणजे पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे लघुरूप नव्हे हे स्पष्ट केले तसेच देशविदेशातील लघुपट दाखवून व व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करण्यात .भारतात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावेत. आणि लघुपटा विषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचावी. हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू होता. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत यांनी प्रास्ताविक केले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांनी मान्यवरांचे स्वागत केले.सुबोध जाधव,गणेश घुले,मंगेश निरंतर,श्रीकांत देशपांडे,महेश अचिंतलवार आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद