यशवंतराव चव्हाण यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र,औरंगाबाद व मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जीवनविषयक कार्याचा वेध घेणार्‍या रेखाचित्र दालनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

प्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, मधुकरअण्णा मुळे,डॉ.दादा गोरे, कुंडलीक अतकरे बिजली देशमुख, विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित या प्रदर्शनात एकूण 28 रेखाचित्रे असून, त्यामध्ये शिवनेरी गडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या प्रतिमेचे अनावरण प्रसंगाची चित्र मालिका, महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्या गेला त्या प्रसंगाची चित्रमालिका त्याच बरोबर संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी व राज्यनिर्मितीचा आनंद सोहळा असे एकूण 28 रेखाचित्रांमधून मा. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जीवनपट या चित्र मालिकेत उलगडून दाखविण्यात आला आहे. सदरील चित्रप्रदर्शन कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या प्रसंगी, विभागीय केंद्राचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री अंकुशराव कदम यांचा मसाप चे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकरराव मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच नवनियुक्त सदस्य बिजली देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी यशवंतराव चव्हाण यांचे मसाप सोबत असलेल्या ऋणानुबांधावर प्रकाश टाकला विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा कैलास अंभुरे यांनी केले याप्रसंगी विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव,गणेश घुले,मंगेश निरंतर,मयूर देशपांडे महेश अचिंतलवार,डॉ. संदीप शिसोदे आदी उपस्थित होते

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद