विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीचे दर्शन व्हावे, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित 'स्वच्छद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १९ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे सुरू होईल. सर्वांसाठी प्रवेश खुला असून विभागीय केंद्रतर्फे कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद