औरंगाबाद (दि.१२) : देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर असताना यशवंतराव चव्हाण यांनी अमेरिकेकडून शस्त्रास्त्रासाठी मदत मागितली पण, त्यांनी जुने तंत्रज्ञानच देण्याचे आश्वासन दिले. याऊलट यशवंतराव चव्हाणांमुळे रशियाने भारताला अनेक अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानांची मदत केली.त्यानंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध वृद्धींगत झाले. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीसंबंधाची पायाभरणी झाली, असे मत श्रीनिवास देशमुख यांनी व्यक्त केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'रशिया-युक्रेन संघर्ष आणि भारत' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे सदस्य सुहास तेंडुलकर, डॉ.आशा देशपांडे, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, प्रा.एच.एम.देसरडा आदींची उपस्थिती होती. श्रीनिवास देशमुख पुढे म्हणाले, जगाने रशियाला मानाचे स्थान द्यावे, यासाठी पुतिनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या यासंदर्भातील प्रयत्नांना यश न आल्यामुळे युद्धाची ठिणगी पडली. युक्रेनविरुद्धचे युद्ध रशियासाठी स्वत:ची प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. रशिया हा भारताचा मित्रराष्ट्र असला तरी सध्या चीनने रशियाशी बरीच जवळीक साधली आहे. चीनचे रशियासोबत भारतापेक्षा १० पट अधिक व्यापार आहे. त्यामुळे भारताला मोठा धोका आहे. त्यातच भारताकडे अन्य देशांशी द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी परराष्ट्र धोरणाशी संबंधीत मनुष्यबळाचा अभाव आहे. दुसरीकडे, भारताचा अमेरिकेशी रशियापेक्षा ४० टक्के अधिक व्यापार आहे. अशात भारत अमेरिका किंवा रशिया दोघांनाही दुखवण्याच्या मनस्थितीत नाही. आगामी काळात भारताला आपले द्विपक्षीय धोरण मजबुत करण्याची गरज आहे. माहिती व तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत मजबुत आहे. या क्षेत्रातील व्यापारी संबंध रशिया आणि यूरोपियन यूनियनमध्येही वाढवण्याच्या दृष्टीने भारताने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही देशमुख म्हणाले. दरम्यान,उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही देशमुख यांनी दिली.महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले तर विवेक राठोड यांनी आभार मानले.या कार्यक्रमास प्रा. युसूफ बेनुर, प्रा. बाळासाहेब सराटे, प्रा. अविनाश गोरे, प्रा. वैशाली चौधरी, प्रा. विशाखा गारखेडकर, प्रा. आर्या तेंडुलकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश निरंतर, प्रतिक राऊत, अक्षय गोरे, रायभान सिसोदे आदींनी परिश्रम घेतल

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद