यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत पेट्रोरसायने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह डॉ. अनंत पांडुरंग देशपांडे यांनी पेट्रोरसायन म्हणजे नेमकं काय? कच्च्या तेलाचा शोध कसा लागला ? भारतातील पेट्रोरसायन कारखाने तसेच पेट्रोरसायनांचा उपयोग आणि अपाय काय याबद्दल त्यांनी माहिती दिली. शेवटी प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]