यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे लिपस्टिक, लिप ग्लॉस आणि लिप बाम प्रात्यक्षिक आणि प्रॅक्टिकल सेशन आयोजित करण्यात आले आहे. याचे शुल्क १,५०० असून यामध्ये सहभागी होणा-या प्रत्येकास छापील नोट्स, प्रॅक्टिकल सेशन तसेच १ लिपस्टिक, १ लिप ग्लॉस आणि १ लिप बाम दिले जाईल. मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत बेसमेंट हॉल, यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे हे सत्र होईल.
मर्यादित १५ जागा असून यासाठी अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी ८२९१४१६२१६ ऑफिस २२०४५४६० विस्तारित २४४.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक