चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक,सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ३ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध रशियन दिग्दर्शक आंद्रे तारकोवस्की यांचा ‘नॉस्टॅलजिया हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी,विश्वास को-ऑप. बँकेसमोर,सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
हा चित्रपट म्हणजे रशियन कवी आंद्रे गोर्शकोव्ह व त्याची दुभाषी युजेनिया यांचा अठराव्या शतकातील इटली मधील एका छोट्या स्पा असलेल्या शहरातील रशियन संगीतकाराचा शोधाचा प्रवास आहे. तिथे त्यांची गाठ वेडसर असलेल्या डॉमिनिकोशी होते. डॉमिनिको,आंद्रेई व युजेनिया यांचा प्रवास एक स्वप्नवत वाटावा असा आहे.
शांततेचा अतिशय प्रभावीपणे केलेला वापर, अप्रतिम छायाचित्रण व अतिताची ओढ ह्यामुळे नॉस्टॅलजिया एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो.
१९८३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १२५ मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील,कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक