नाशिक (दि. १३) : कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘ सूर विश्वास ’ हा अनोखा उपक्रम विश्वास गृप तर्फे सुरू करण्यात आला आहे. ‘ विश्वास ग्रृप ’ चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून , संकल्पना विनायक रानडे यांची आहे. शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ६.३० वा. अमृता जोशी यांच्या गायनाचे दहावे पुष्प गुंफले जाणार आहे. रसिक कुलकर्णी (तबला), कृपा परदेशी (संवादिनी) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे करणार आहेत. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास गार्डन शेजारी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अमृता जोशी यांनी गायनाचे प्राथमिक शिक्षण शिवानी दसककर यांच्याकडे घेतले. पुढील शिक्षण, पं. डॉ. अलका देव मारुलकर यांच्याकडे समग्र गायकीचे आठ वर्षे शिक्षण घेतले असून, सध्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका मंजिरी असनारे-केळकर यांच्याकडे शिक्षण सुरू आहे. एस. एन. डी.टी. विद्यापीठ, मुंबई येथून संगीत विषयत बी.ए., एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. तसेच विद्यापीठातील गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान (मुंबई) तर्फे पदवी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. अनेक स्पर्धा, विद्यापीठ युवा महोत्सवात पारितोषिके प्राप्त झाली असून गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर तर्फे जयपूर-अत्रौली घराणा विशेष पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक नामांकित संगीत महोत्सवात गायन करण्याची संधी मिळाली आहे. सद्या नाशिक येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक