ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आज जगातल्या महत्त्वाच्या जमीन पाणथळी वाचवण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैव विविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे,असे प्रतिपादन जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने आयोजित व्याख्यानात सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ व छायाचित्रकार सतीश गोगटे यांनी केले. नांदुरमध्यमेश्‍वर एक परिक्षण या विषयावर स्लाईड शो व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.गोगटे यांनी या प्रसंगी ग्लोबल वॉर्मिंग रामसर कन्व्हेंशन,नांदूरमध्यमेश्वर परीसर ,नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य,पक्षी वैविध्य आदी विषयांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ,शासकीय यंत्रणा,शासन,सामाजिक संस्था यांच्या सहभागातून संरक्षण व संवर्धन होऊ शकते. त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य घेण्याची गरज आहे. आजकाल पाणी,जलसंवर्धन,पावसाच्या पाण्याचे नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पक्षी संरक्षणासाठी नुसतेच पर्यटन करून उपयोग नसून त्यासाठी अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे.
सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की पक्षी मित्रमंडळासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी प्रतिष्ठान सहकार्य करेल. निसर्गाचे संवर्धन व पक्षांचे संरक्षण करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक