नाशिक:यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार ९ जून २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध बेल्जियम दिग्दर्शक जॉ पिएरे आणि ल्युक दार्दान यांचा ‘दि प्रॉमिस’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.

‘दि प्रॉमिस’ मध्ये इगॉर ह्या पंधरा वर्षीय तरूणाची कथा आहे. त्याचे वडील बेल्जीयममध्ये अवैध मार्गाने प्रवेश करणार्‍या परदेशस्थांना मदत करतात. अर्थातच हा त्यांचा व्यवसाय धोकादायक व अनैतिक आहे. अमिडु हा परदेशस्त आफ्रिकन अपघातात मरतो. पण त्याच्या बायकोला असोताला त्याची कल्पना नसते. त्या घटनांचा विलक्षण चक्राऊन टाकणारा शोध या चित्रपटात आहे. नातेसंबंधातील नाट्यमयता पाहण्यासाठी जरूर या. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९४ मिनीटांचा आहे. ‘दि प्रॉमिस’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक