नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार २१ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध ग्रीस दिग्दर्शक थिओ अ‍ॅन्जेलोपुओलॉस यांचा ‘द ट्रॅव्हलींग प्लेअर्स’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.

‘द ट्रॅव्हलींग प्लेअर्स’ या प्रदीर्घ चित्रपटामध्ये थिओ आधुनिक ग्रीसच्या इतिहासाचा पट फिरस्थ्या नट मंडळींच्या गटाच्या माध्यमातुन उलगडतो. हा चित्रपट १९३९ मधील ग्रीसमध्ये सुरू होतो आणि दुसरे महायुद्ध व नंतर यादवीयुद्ध असा प्रवास करत १९५२ पर्यंतचा कालखंड उभा करतो. ग्रीस प्रस्तुत कालखंडात कसा ढवळून निघाला होता ह्याचे अत्यंत तपशीलासह चित्रण यात आहे. सन १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी २१० मिनीटांचा आहे.
‘द ट्रॅव्हलींग प्लेअर्स’ या चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.मनोज शिंपी, कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ.कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, सौ.कविता कर्डक, गुरमित बग्गा, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुधीर संकलेचा व विक्रम मोरे यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक