रविवारी अनोखी गुरूपौर्णिमा

नाशिक : जीवनाच्या जडणघडणीत गुरूंचं जसं स्थान मोलाचे आहे तितकंच आपलं सृष्टीशी व निसर्गाशी आहे. कलावंतांच्या कलेचे अविष्कार तर निसर्गाची विविध रूपे घेऊन अवतरत असतात. याच सृष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमेला एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ या संत तुकाराम महाराजांच्या विचारांशी बांधिलकी जोडण्याचा हा अनोखा उपक्रम आहे. आर्किटेक्ट, चित्रकार शितल सोनवणे यांची या उपक्रमाची संकल्पना आहे. ‘आर्ट ऑफ शितल’ तर्फे आयोजित हा कार्यक्रम रविवार ९ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गंगापूर रोड जवळील सुयोजित गार्डन, दत्त चौक, सहदेव नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. येथे आठ फुटाच्या भिंतीवर चिमण्या पोपट, बुलबुल इत्यादी पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यात आली आहेत.

कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थित शपथ घेणार आहेत. मी पर्यावरणाचे रक्षण करेन, प्लास्टीकचा वापर करणार नाही, हॉर्न वाजवून ध्वनीप्रदुषण करणार नाही. जनजागृती व प्रबोधनपर हा उपक्रम आहे. निसर्ग या गुरूला वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘आर्ट ऑफ शितल’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक