यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , नवी मुंबई विभागीय केंद्रातर्फे पनवेल येथील गजानन महाराज लीला ट्रस्ट संचलित अनाथ मुलांच्या शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस , खाऊ वाटपास प्रायोजकत्व देण्यात आले. या शाळेत ६०० मुलं मुली असून चित्रकला , नृत्य , क्रीडा यात ही मुलं निपुण आहेत. नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी संस्था चालक जगदीश जाधव यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई