यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे ‘ दहावी व बारावी नंतरचं नवं क्षितीज ’ या विषयावर प्रा. संदीप नेमळेकर यांचे स्टर्लिन कॉलेज नेरूळ येथे करिअर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी २०० हून अधिक उपस्थित विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. प्राध्यापक संदीप नेमळेकर व मिलिंद आचार्य यांनी ३ तास सविस्तर मार्गदर्शन केल्यावर विद्यार्थ्यांच्या अनेक करिअरविषयक प्रश्न विचारले असता त्यांनी मार्गदर्शन केले. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे मुलांचा कल पाहून त्यांना उचित मार्गदर्शन झाल्याने पालकवर्ग समाधानी होता.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई