यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राने "यशवंत सन्मान २०२१" हा पुरस्कार जाहीर केला असून त्यामध्ये नव्या मुंबईतील 3 संस्था व १७ गुणी व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी दिली. प्रतिष्ठान च्या नवी मुंबई केंद्राची निर्मिती 3 वर्षांपूर्वी झाली व त्यानंतर केंद्राने प्रतिवर्षी " यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार " सेवाभावी संस्थेस दिले. साहित्य विषयक कार्यक्रम घेतले. चित्रपट कार्यशाळा, बुद्धिवंतांची व्याख्याने, कवी संमेलन, करियर गायडन्स शिबीरे, जेष्ठ नागरिक संघास वैद्यकीय उपकरणे पुरविणे अशा अनेक उपाक्रमांचे आयोजन केले आहे. शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते यशवंत सन्मान पुरस्कार २०२१ चे पुरस्कार गुणीजणांना प्रदान केले जाणार आहेत व त्याचवेळी रु 1 लाखाची वैद्यकीय उपकरणे जेष्ठ नागरिक संघाच्या रुग्ण सेवा केंद्रास प्रतिष्ठान मार्फत मंत्री महोदय यांचे हस्ते प्रदान केली जाणार आहेत. यशवंत सन्मान पुरस्कारामध्ये साहित्यिक संजय कृष्णा पाटील, अभिनेत्री सारिका नवाथे, जलतरण पटू शुभम वनमाली, आदर्श शिक्षण समूह, मुस्लिम समाजसेवक अलीमियाँ शमशी, गीतकार प्रकाश राणे, आरोग्य दूत प्रसाद अग्निहोत्री अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे, असे प्रमोद कर्नाड अध्यक्ष यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई