यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ‘गावरान २०२२’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंहगड रोडवरील अभिरुची मैदान या ठिकाणी दिनांक २, ३ आणि ४ डिसेंबर रोजी हा महोत्सव पार पडणार आहे.

या महोत्सवामध्ये ग्रामीण भागातील युवा आणि महिला उद्योजकांचे सुमारे दोनशे स्टॉल असणार आहेत.यामध्ये ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेले विविध उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील युवा व महिला उद्योजकांनी बनविलेले खाद्यपदार्थ तसेच ग्रामीण पद्धतीने बनविलेला चविष्ट स्वयंपाक देखील या महोत्सवात असणार आहे. यामध्ये चुलीवरची बाजरी-ज्वारी- तांदुळ-नाचणी भाकरी, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, गावरान तुपातील चिकन-मटन बिर्याणी, जळगावी वांग्याचं भरीत, मांडे, उकडीचे मोदक, कढी, ताक, सोलकढी आणि अजून विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत.

ग्रामीण भागातील उद्योजकांच्या दर्जेदार उत्पादनांची शहरी भागात विक्री व्हावी आणि ग्रामीण महिला व युवा स्टार्ट-अप उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे हा ‘गावरान २०२२’ महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. यावर्षीच्या ‘गावरान २०२२’ महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात व्यवसाय क्षेत्राशी संबंधित अनेक विषय तज्ञांची व्याख्याने ठेवण्यात आलेली असून त्यासाठी एक वेगळे व्यासपीठ तिथे उभारण्यात येणार आहे.

तरी सर्वांनी या “गावरान - २०२२” महोत्सवासाठी आवर्जून भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क -
९४०४७ ६४१७६ किंवा ९८८११ ४९३९६

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - पुणे
दिनांक : 
02 December 2022
ते
04 December 2022
वेळ : 
11:00
ते
10:00
ठिकाण : 
अभिरुची मैदान, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पुणे -४११ ०४१