यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी’ या विषयावर तेरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद-२०२२ आयोजित करण्यात आली आहे. या शिक्षण परिषदेत तज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे होणार आहेत.

तसेच डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळा याच कार्यक्रमात होणार आहे. हा पुरस्कार एकूण पाच उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथांना देण्यात येणार आहे.

देशोदेशींचे शालेय शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रश्न मनातले व शिक्षणगंगा- फिनलंडमधून आपल्या दारी या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.

रविवार, दि. ४ डिसेंबर २०२२ | वेळ - स. ९.३० ते सायं.५.३०
स्थळ- मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
04 December 2022
वेळ : 
09:30
ते
05:30
ठिकाण : 
यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

use google maps on website