यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व विभागीय केंद्र परभणी यांच्यावतीने दि. ४ मार्च रोजी परभणी-पाथरी महामार्गावरील रानमेवा मळा येथे 'कृषक-कृषी सन्मान २०१९' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्काराचे मानकरी ठरलेले लोहगाव येथील सीताराम देशमुख हे एक कसदार शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यांनी प्रमाणित पाण्याचा वापर करून अंजीर फळाचे दर्जेदार उत्पादन काढले आहे. मा श्री.सितारामजी देशमुख व सौ.वनमाला सि.देशमुख यांना 'कृषक-कृषी सन्मान २०१९ ' स्मृतिचिन्ह,मानाचे वस्त्र व रोख रक्कम ११,००० रू. देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री.प्रा.अशोक जोंधळे यांनी 'मोठका पाणी' हि रचना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम शेती व काळ्यामातीचा सन्मान करणारा असल्यामुळे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी मा.प्रा.श्री.इंद्रजीत भालेराव यांनी 'माझ्या गावकड चाल माझ्या दोस्ता' हि रचना सादर केली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.ना.डॉ.अशोक ढवण (कुलगुरू,व.ना.म.कृ.वि.परभणी) तर प्रमुख पाहुणे मा.डॉ.सौ. संध्याताई दूधगावकर(अध्यक्ष,वि.के.परभणी), मा.श्री. विजयरावजी कान्हेकर(सचिव,वि.के.परभणी), मा.श्री.इंद्रजीत भालेराव( महाराष्ट्राचे सुपरीचीत कवी तथा सल्लागार वि.के.परभणी), मा.श्री.सोपानराव अवचार(कृषी व्यासपीठाचे प्रमुख संयोजक), मा.सौ.भावनाताई नखाते(उपाध्यक्ष जि.प.परभणी) तसेच या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य श्री.बाळासाहेब फुलारी, विलास पानखेडे, अनिल जैन, किरण सोनटक्के, रमेश जाधवर, सुमंत वाघ, प्रमोद दलाल व विष्णू वैरागड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बबन आव्हाड यांनी केले तर आभार मा.विलास पानखेडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरीक व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - परभणी