यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र परभणी व श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि. ८ माच॔ २०१९ रोजी "वीर माता व वीर पत्नी यांचा गौरव सन्मान "श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सभागृह येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.डॉ.सौ.संध्याताई दूधगावकर (प्राचार्य तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र,परभणी) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ.भावनाताई नखाते (उपाध्यक्ष,जि.प.परभणी तथा महिला व्यासपीठ प्रमुख विभागीय केंद्र परभणी) मा.सौ.विजयश्री पाथ्रीकर,मा.प्रा.आनंद पाथ्रीकर (प्राचार्य,श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय परभणी) मा.प्रमोद दलाल व मा.विष्णू वैरागड(समन्वयक,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र,परभणी) यांच्या शुभ हस्ते परभणी जिल्ह्यातील वीर माता व वीर पत्नी यांचा शाल,श्रीफळ व साडीचोळी देवून यथोचित गौरव करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्वाती विभुते तर सूत्रसंचालन मयुरी जोशी व नेहा मुंडलिक यांनी केले व आभार प्रा.अपूर्वा रोकडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन युवक व युवती व कम॔चारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार मुर्तीनंसाठी शाही भोजनाचे श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालया तफ॔ आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमा दरम्यान शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील युवतींनी देशभक्तीपर गितावर सुंदर नृत्य सादर केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - परभणी