यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विभागीय केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा-संवाद कार्यक्रमाचे आयोजन २२ डिसेंबर २०१८ रोजी ज्ञानोपासक महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून परभणी केंद्राच्या अध्यक्षा सौ. संध्याताई दूधगावकर, तर प्रमुख पाहूणे म्हणून मा. विलासजी पानखेडे होते. मा.बाळासाहेब फुलारी, मा.किरणजी सोनट्टकेसर, मा.सुमंत वाघ यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. आजच्या युवा-संवादाचे वक्ते तथा युवंकाचे मार्गदर्शक मा. श्री. सागरजी रेड्डी यांनी खास युवकांशी संवाद साधला.

राज्य शासन १८ वर्षापर्यंत अनाथ मुलांचा सांभाळ करतात. त्यामुळे मुले वाम मार्गाला लागू नयेत म्हणून मा.सागर रेड्डी यांनी पाच राज्यात १८ वर्षांपुढील मुलांसाठी अनाथ आश्रम सुरू केले आहेत. रेड्डी यांनी मुलांसाठी अनाथ आश्रम चालू करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - परभणी