सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प्रा. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास महाराष्ट्र राज्याची निमिर्ती व समकालीन समस्या या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मा. युनुसभाई शेख असतील, तर प्रमुख उपस्थिती मा. पद्माकर कुलकर्णी यांची असेल. हा कार्यक्रम १ मे २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सिध्देश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे सुरू होईल. डॉ. गो. मा. पवार अध्यक्ष, राजशेखर शिवदारे कोषाध्यक्ष, दिनेश शिंदे सचिव, धर्मण्णा सादूल, दिलीपराव सोपल, दत्ता गायकवाड, दिपक साळुंखे आणि राहूल शहा यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने सोलापूरकर वासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर