सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे प्रत्येकवर्षी घेण्यात येणा-या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय नियतकालिक स्पर्धेत सोलापूरच्या ऑर्किड कॉलेजच्या ऑर्कीड ओरा २०१७ या नियतकालिकाला दुसरा क्रमांक मिळाला. तसेच पारितोषिक वितरण जेष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना देशपांडे म्हणाले, नियतकालीकेत प्रकाशित झालेल्या सिंधुताई सपकाळ ते फिडेल कॉस्ट्रो या लेखातून आजच्या तरुण पिढीची समाजाशी असलेली नाळ दर्शवित आहे. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, औरंगाबाद विभागाचे सरचिटणीस निलेश राऊत, विजय कान्हेकर आणि दिनेश शिंदे उपस्थित होते.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर