यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, ठाणे जिल्हा केंद्र तर्फे ‘ कार्यकर्ता ’ या भूमिकेतून विविध क्षेत्रात तळमळीने काम करून लोकप्रिय झालेल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद म्हणून ‘ मी कार्यकर्ता ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयवंत वाडकर, किरण वालावलकर, डॉ. अरुण पाटील, विद्याधर ठाणेकर, लतिका भानुशाली, पोर्णिमा शेंडे आणि डॉ. महेश केळुसकर यांचा सहभाग असणार आहे. शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मंगला हॉल, १ ला मजला, ठाणे पूर्व येथे हा कार्यक्रम विनामूल्य संपन्न होणार असून आदिवासी लोकांना जुने कपडे, पुस्तके व चांगली भांडी देण्याची इच्छा असल्यास कार्यक्रमाठिकाणी या वस्तू स्विकारल्या जातील.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे