स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी परंपरांचे संचित घेऊन आधुनिकतेकडे वहावत जाणा-या यशवंतराव चव्हाणांच्या जीवनदृष्टीचा वसा आणि वारसा पुढे चालविण्याच्या दृष्टीने त्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. मनिष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजिक केला. त्याप्रसंगी प्रा. नितीन आरेकरांनी कैद्यांना यशवंतराव चव्हाणसाहेबांची घरची गरिबीची परिस्थिती असून देखील परिस्थितीशी झुंज देऊन आपले शिक्षण कसे पूर्ण केले व राजकारणात शिरुन ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळले. केंद्रात विविध खात्यांचे मंत्री ते उपपंतप्रधान अशी पदे कशी भूषविलीत यावर प्रकाश टाकला. परिस्थिती बिकट होती म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला नाही. म्हणून त्यांनी कैद्यांना आवाहन केले, की तुम्ही बाहेर पडल्यावर स्वावलंबी व्हा. चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. अध्यक्षस्थानी असलेल्या उपायुक्तांनी कैद्यांना आश्वासन दिले की त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहाता यावं म्हणून विविध कंपन्यांच्या योजनेखाली छोटे छोटे तांत्रिक अभ्यासक्रम पुरे करावेत. त्यासाठी त्यांच्याशी कारागृहातून बाहेर पडल्यावर संपर्क साधावा व पुढील कालावधीत स्वाभिमानाचे आयुष्य जगावे. शेवटी केंद्र अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कारागृहाचे अधिक्षक यांना 'कृष्ठकाठ' च्या प्रती भेट देण्यात आल्यात.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे