यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या ठाणे विभागीय केंद्र आणि रोटरी कल्ब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विचारकुंकू’ ह्या एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १७ फेब्रुवारीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे, सहयोग मंदीर, दुसरा मजला, ठाणे पश्चिम येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

महिला सक्षमीकरणाच्या हेतूने नामवंत प्रतिष्ठीत महिलांचे मार्गदर्शन सर्वसामान्य महिलांना मिळावे या कारणास्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांची मुलाखत प्रा. अनुया धारप आणि पूजा प्रधान घेणार असून 'श्वास' चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे यांचे कथाकथन व  रोटरी सामाजिक श्रेष्ठता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे ठाणे प्रतिष्ठान विभागाचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुस्कर आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नार्थचे अध्यक्ष रणवीरसिंह राठोड यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे