दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी नियोजनानुसार 'यशवंत व्याख्यान' मालेचे थाटामाटात उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या 'मुलभूत विज्ञानाच्या संशोधनाच्या नव्या दिशा' या व्याख्यान्याच्या पहिल्या पुष्पाने झाले. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्या उपस्थितीत यशवतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,ठाणे केंद्राचे अध्यक्ष श्री. मुरलीधर नाले यांच्या प्रास्ताविकाने सुरुवात झाल्यानंतर कुलसचिवांनी त्यांचे मनोगत मांडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या कृषी व सहकार विभाग, पुणे यांनी घेतलेल्या निबंध स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पुरस्कार दिल्यानंतर ' यशवंतराव चव्हाण : जडण घडण' या पद्मश्री मधु मंगेश कर्णि, श्री अरुण साधू आणि प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. अनिल काकोडकर व्याख्याने श्रौते मंत्रमुग्ध झाले आणि ख-या अर्थाने यशवंतव्याख्यानमालेचा शुभारंभ झाला.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे