मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) - राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२ मे २०२२ रोजी राज्यस्तरीय आरोग्य जन जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सुसूत्रीकरण यावे, या योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळावा त्याचे सुलभीकरण कसे करता येईल याविषयावर सर्वंकष चर्चा करता यावी यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांचे आरोग्य हे सुदृढ समाजासाठी महत्वपूर्ण आहे व त्यासाठी शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारची आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना या दोन योजना राबवल्या जातात. या योजनांचे सामान्य जनतेला फायदे आहेत. तसेच काही वेळा त्यांना आव्हानाचा सामनाही करावा लागतो. म्हणून चव्हाण यशवंतराव चव्हाण, सेंटर, आरोग्य विभागाच्या माध्यमातून या योजनांमध्ये सुसूत्रीकरण यावे, या योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळावा त्याचे सुलभीकरण कसे करता येईल याविषयावर सर्वंकष चर्चा करण्यासाठी चव्हाण, सेंटरच्या आरोग्य विभागामार्फत दि. १२ मे २०२२ रोजी राज्यस्तरीय आरोग्य जन जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबई गेल्या ३० वर्षाहुन अधिक काळ ‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे ब्रीद वाक्य घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेची कार्यप्रणाली ही सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे. 'आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, दिव्यांग,जेष्ठ नागरिक, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई catalyst म्हणून कार्यरत असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. ही परिषद १२ मे रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील सर्व अधिकारी तसेच डॉक्टर्स, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य मित्र, आरोग्य सुविधांमध्ये काम करणारे सर्व स्वयंसेवक या सर्वांनी आपले विचार, कल्पना घेऊन जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या https://chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. चव्हाण सेंटरतर्फे डॉ. समीर दलवाई, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, निलेश राऊत, डॉ. नरेंद्र काळे, अभिजीत राऊत हे या परिषदेचे समन्वयक म्हणून काम पहात आहेत.

आरोग्य परिषदेत चर्चिले जाणारे विषय :-
* केंद्र सरकारची आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना: भूमिका, उपयुक्तता, सल्ला आणि दुरुस्त्या

*या परिषदेमध्ये दोन्ही योजनांची तज्ज्ञांकडून सखोल महिती मिळणार असून व या दोन्ही योजना समजून घेता येतील तसेच या योजनांचा लाभ कसा घेता येतो, योजनांची सद्यस्थिती, योजना लोकाभिमुख कशा करता येतील याबदल तज्ज्ञांचे मत आणि शासनाची भूमिका जाणुन घेता येईल.

*परिषदेमध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पेपर सादरीकरण करणार आहेत. तसेच त्याच्या अनुषंगाने सर्वंकष चर्चा करणार आहेत.

अधिक माहितीसाठी :
दिपिका शेरखाने- समन्वयक,
आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभाग,
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई +919867155345
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
सुकेशनी मर्चंडे - +918652118949
०२२-२२०४५४६० विस्तारित -२२४