मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर आणि परिसर आशा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील मुलांच्या मानसिक आरोग्य आणि वर्तवणुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी विनामूल्य हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये वर्तणुकीच्या समस्या, शैक्षणिक समस्या, एकाग्रता, नातेसंबंधातील अडचणी, अस्वस्थपणा, भीती, वैफल्य, क्रोध, स्क्रीनचे व्यसन, अंमली पदार्थ, शिक्षणातील अडथळे, करियर विषयक मार्गदर्शन, इ. करण्यात येईल.

मुलांच्या वर्तवणुकीशी संबंधित सर्व प्रकारच्या मानसिक समस्या या हेल्पलाईनद्वारे सोडवण्यात येणार असून संबंधितांची संपूर्ण माहिती पूर्णत: गोपनीय ठेवली जाणार आहे. अशी ही 'पॉझिटिव्ह पॅरेंटिंग आणि चाइल्ड हेल्पलाइन' असल्याचे चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

ही हेल्पलाईन १८००५३२२२४४ आणि ९५९४४६६४६१ या क्रमांकावर सकाळी ९ ते रात्री ९पर्यंत उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

लहान मुले, युवा आणि प्रौढानाही या हेल्पलाईनचा लाभ घेता येणार आहे. चव्हाण सेंटर आणि परिसर आशाचे तज्ज्ञ समुपदेशक सर्व प्रश्न ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करतील. या हेल्पलाईन शिवाय This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. / This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेलद्वारे देखील संपर्क साधता येईल, असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.