जोती वाय. एल.

युवा पत्रकारिता पुरस्कार
2024

मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील अरुंद गल्ल्यांपासून ते जागतिक व्यासपीठापर्यंत मजल मारलेल्या जोतीचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जोती यांनी लहान सहान नोकऱ्यांचा आधार घेत आपले पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून सामान्य लोकांचा संघर्ष त्यांनी बघितला होता. याच संघर्षामुळे त्यांच्या ध्येयाला खऱ्या अर्थाने आकार मिळाला आहे.

२०१४ पासून त्यांनी मराठी वृत्तवाहिन्यांमधून पत्रकारितेची कारकिर्द सुरु केली. २०१७ मध्ये मराठीतून इंग्रजीत पदार्पण केले आणि त्यांनी पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (वेब पोर्टल) च्या वरिष्ठ रिपोर्टर म्हणून पदभार स्वीकारला. आजवर त्यांनी महाराष्ट्रातल्या गडचिरोली, नंदुरबार सारख्या दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या दुष्काळी भागातून, भटक्या विमुक्त, आदिवासी आणि इतर उपेक्षित समुदायांचे दुर्लक्षित प्रश्न मांडले आहेत. पत्रकारीतेसाठी वाहून घेतलेल्या जोती यांना रेड इंक पुरस्कार, चाणक्य पुरस्कार आणि लाडली मीडिया पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आंतराराष्ट्रीय पातळीवरही आपली ओळख मिळवत २०२२ मध्ये आशिया जर्नलिझम फेलोशिप देखील प्राप्त केली आहे.

कामानिमित्त वारंवार स्थलांतर करावे लागणाऱ्या मजुराच्या मुलाला शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो? ही संघर्षमय कथा जोती यांनी ‘लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ या नव्या कोऱ्या पुस्तकात मांडली आहे. जोती यांचे शब्द म्हणजे एक चळवळ आहे, एक क्रांती आहे, दबलेल्या आवाजाचा न्याय आहे.

ज्योती वाय.एल. यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media