ऋतुजा मोरे

युवा उद्योजक पुरस्कार
2025

बदलतं जग आणि बदलत्या गरजा… या गरजांना कल्पकतेची जोड देऊन बांधकामाची नवी व्याख्या रचणारी एक तरुण उद्योजिका अर्थात आर्किटेक्ट ऋतुजा मोरे. युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅममधून 'डिस्टिंक्शन'सह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्या बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवू पाहत आहेत. मॅजिक स्ट्रक्चर्स'च्या माध्यमातून पारंपरिक विटा-सिमेंटच्या पलीकडे जाऊन त्यांनी 'मोड्युलर' आणि 'पोर्टेबल' घरांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. ही घरे केवळ टिकाऊच नाहीत, तर ती हवी तिथे सहज हलवता येतात. महिनाभराचे काम अगदी काही दिवसात होते.

फार्महाऊस असो वा रिसॉर्ट, ऋतुजा यांच्या 'मॅजिक स्ट्रक्चर्स'ने कमी वेळात आणि कमी खर्चात पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. केवळ इंजिनिअरिंगपुरता मर्यादित असलेला हा विषय त्यांनी आपल्या आर्किटेक्चरल दृष्टीने सौंदर्याच्या शिखरावर नेला आणि एका यशस्वी उद्योजिकेची ओळख निर्माण केली. पोलीस पाल्यांच्या वसतिगृहाचा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याबद्दल पुणे पोलीस आयुक्तांकडून गौरव असो, वा आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश; त्यांच्या कर्तृत्वाची मोहोर सर्वत्र उमटली आहे.

बांधकाम क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ऋतुजा मोरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी

यशवंतराव चव्हाण डिजिटल मीडिया