ऋतुजा सोनवणे

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2024

ऋतुजा जेव्हा शाळेत जायची तेव्हा तिचे शिक्षक परिपाठाच्या वेळी हार्मोनियम वाजवायचे. ऋतुजा तेव्हा कुतूहलाने त्याकडे बघायची. हळूहळू ऋतुजाचे पाय संगीत कशाकडे वळू लागले. घरात जेव्हा रेडिओ अथवा टीव्हीवर मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम लागला की ऋतुजाची बोटे आपोआपच एखाद्या टेबलावर किंवा तत्सम वस्तूंवर फिरायची. घरच्यांच्या हे लक्षात आले आणि ऋतुजाला हार्मोनियम शिकण्यास प्रोत्साहन दिले.

शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची खरी सुरुवात वसंत मयुर चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पुढे गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देऊन ऋतुजा बारावीत असतानाच संगीत विशारद झाली. गेल्या चार वर्षांपासून ऋतुजाचे समकालीन श्रेष्ठ वादक तन्मय देवचके यांच्याकडून ती हार्मोनियमचे प्रशिक्षण घेत आहे. पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत ऋतुजाला सुवर्णपदक मिळाले आहे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने सन्मान देखील करण्यात आला आहे. तिच्या पुढील सांगीतिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !

जळगाव जिल्ह्याच्या एका गावात जन्माला आलेला हा ऋतुजा नावाचा सूर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमावा, याच सदिच्छा !

ऋतुजा सोनवणे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media