मा. सुप्रिया सुळे
कार्याध्यक्ष

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली त्यामुळे सामान्य माणूस केंद्रस्थानी आला. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. चव्हाण सेंटरची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीद आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरीता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे’, ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. मी नव्या पिढीला विशेषतः तरुणांना आवाहन करते की,

"आपण आपले विचार, कल्पना घेऊन या कार्यात सहभागी व्हावे. आपण सगळे मिळून यशवंतरावांच्या स्वप्नातील आधुनिक आणि समतावादी महाराष्ट्र घडवूया."