केवळ श्रवणयंत्र नसल्यामुळे ऐकू न येणाऱ्या लहान मुलांच्या भाषा व वाचा विकासावर परिणाम होतो. याशिवाय वयोमानापरत्वे ज्येष्ठ नागरिकांना कर्णबधिरत्व येते. त्यांना पूर्ववत ऐकू येण्यासाठी श्रवणदोष तपासणी व निवारण हा उपक्रम राज्यभरात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येतो. यासाठी चव्हाण सेंटरच्या माध्यमातून जिल्हानिहाय दिव्यांगांची नाव नोंदणी पूर्वतपासणी व वितरण शिबिरांचे आयोजन केले जाते.