दिव्यांग प्रवर्गाला शासकीय योजनांचा थेट लाभ व्हावा यासाठी आणि या प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत असतात. दिव्यांगांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी उपलब्ध असणाऱ्या कल्याणकारी योजना, कायदे व सोयी सवलती यांविषयीची जनजागृती वेगवेगळे उपक्रम आणि कार्यशाळेच्या माध्यमांतून केली जातात.

दिव्यांगांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. व्यंगत्वाशी झुंजणाऱ्या दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर सक्षमीकरण व्हावे, यासाठी चव्हाण सेंटर आणि केंद्र व राज्य सरकार यांच्या समन्वयाने विविध शासन निर्णय निर्गमित करण्याकरिता पाठपुरावा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दिव्यांगांच्या सक्षमीकरणावर भर देणाऱ्या विविध योजना राबविल्या जातात.

दिव्यांग प्रवर्ग हा समाजातील दुर्लक्षित घटक आहे, त्याचबरोबर त्यांचा विवाह ही बाब सुद्धा दुर्लक्षित राहिलेली. याचाच विचार करून, आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा आयोजित केला जातो. हा दिव्यांग विवाह सोहळा अत्यंत देखणा असतो.