शिक्षणाचा विचार करणारा आणि त्यातून कृतीप्रवण होणारा समाज घडवणे, हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरचा शिक्षण विभाग कार्यरत आहे. २००८ साली डॉ.कुमुद बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाची स्थापना झाली. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर शिक्षण विभागाची वाटचाल सुरु आहे. हा विभाग शैक्षणिक प्रश्न, शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक धोरण इत्यादी बाबींच्या अनुषंगाने उत्प्रेरक म्हणून काम करतो. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा.सुप्रियाताई सुळे या विभागाच्या निमंत्रक असून डॉ.वसंत काळपांडे हे मुख्य संयोजक, बसंती रॉय या विशेष सल्लागार आणि डॉ.माधव सूर्यवंशी हे या विभागाच्या कोअर टीमचे समन्वयक म्हणून जबाबदारी पाहतात. नजमा काझी, ऐनुल आत्तार, अजित तिजोरे आणि जयवंत कुलकर्णी हे या विभागाचे कोअर टीम सदस्य आहेत. कोअर टीमचे सदस्य आणि शिक्षण विभागाच्या जोडले गेलेले राज्यभरातील आणि भारताबाहेरीलही सुमारे २० हजार सदस्य पूर्णपणे स्वयंसेवी वृत्तीने काम करतात. यात प्राथमिक, माध्यमिक, आणि महाविद्यालयीन शिक्षक, शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षणतज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण प्रेमी आणि पत्रकार यांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रामुख्याने शिक्षण कट्टा, शैक्षणिक साहित्य पुरस्कार, ग्रंथ निर्मिती आणि ग्रंथ पुरस्कार, शिक्षण साहित्य संमेलन, व्याख्याने, पालक मेळावे, दत्तक शाळा योजना तसेच शिक्षकांसाठी प्रशिक्षणे आणि कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबवले जातात.

कार्यक्षेत्र समन्वयक

योगेश कुदळे

कार्य क्षेत्र : 

शिक्षण