गुणवंत युवांच्या कलागुणांना भरारी मिळावी, त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, आपली कला सादर करुन त्यांची स्वत:ची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने ‘शरद युवा महोत्सव’ चे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात विविध स्पर्धांच्या माध्यमातून युवा कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते. या माध्यमातून अनेक कलाकार निर्माण झाले आहेत.