यशस्विनी सामाजिक अभियान इतर कार्यक्रमांमार्फत महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच पुढचा भाग म्हणून आलेल्या पैशाचे योग्य नियोजन व बचत यासाठी महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण दिले जाते.

गावोगावी जाऊन ‘फिरती व्हॅन’ मार्फत बँकेची आणि बँकेच्या कामकाजाची प्राथमिक माहिती देण्यात येते. यामध्ये खाते चालू करणे, पैसे भरणे, पैसे काढणे, कर्ज मिळवणे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ही ‘फिरती व्हॅन’ पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

त्याच कार्यक्रमांतर्गत मुलांना शालेय जीवनापासून अर्थिक साक्षरतेची ओळख व्हावी यासाठी ‘पुस्तिका’ बनविण्यात येतात.