दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा होतो. याचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात निवडक पाच ज्येष्ठ नागरिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

देशातल्या गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारने राष्ट्रीय वयोश्री योजना चालू केली आहे. कानाने कमी ऐकू येणाऱ्या ज्येष्ठांसाठी उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत सोळा हजार ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. तसेच वर्ष २०२१ - २२ मध्ये या उपक्रमाअंतर्गत तब्बल एक लाखाहून जास्त ज्येष्ठ नागरिकांनी नावे नोंदविली आहेत व त्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल.