यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण - तरुणींना सन्मानित केले जाते. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार"!

सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.

२१ हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.