शहरी आणि ग्रामीण भागातील ० ते ३ या वयोगटातील बालकांची तपासणी करुन त्यांच्यातील श्रवणदोष वेळीच ओळखता आले तर त्यावर मात किंवा उपचार करता येणे शक्य आहे. जेवढ्या लवकर श्रवणदोषाचे निदान होईल तेवढ्या लवकर बालकांचा शारीरिक, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक विकास होऊ शकतो. यासाठी नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेंन्शन अँड कंट्रोल ऑफ डेफीनेस हा कार्यक्रम राबविला जातो. याअंतर्गत राज्यातील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात Otoacoustic Emission (OAE) या पद्धतीद्वारे नवजात बालकांची तपासणी व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमार्फत पाठपुरावा केला जात आहे.