विविध माध्यमांतून समाजात प्रभाव पाडणारे डिजिटल मिडिया इनफ्लूअन्सर शोधून त्यांच्यासाठी एका दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत सर्व समाज माध्यमे उदा. यूट्यूब, फेसबूक, इंस्टाग्राम आदींचा अभ्यास असणाऱ्या तरुण-तरुणींचा समावेश असतो. एक चांगला विषय मांडताना आजच्या काळात नेमक्या काय अडचणी येतात? उदा- सामाजिक, राजकीय, सुरक्षा व इतर विषयाशी संबंधित. या सर्व समस्यांवर धोरणात्मक निर्णय घेऊन भविष्यात कार्यशाळा व शिबिरे आयोजित करण्यात येतात.