यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचतर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना ‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्काराने सन्मानित केले जाते.

शिक्षणाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या उल्लेखनीय कार्याचा गौरव शिक्षण विकास मंचातर्फे पुरस्कार देऊन करण्यात येतो. शिक्षण विकास मंचच्या पहिल्या मुख्य संयोजक शिक्षणव्रती डाॅ.कुमुद बन्सल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.

सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटरचे शिक्षण विकास मंच कार्यरत आहे. सेंटरच्या शिक्षण विकास मंचाने आतापर्यंत अनेक परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली आहेत. तसेच शासनाला धोरणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने शिफारशीही केल्या आहेत.