अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षण विषयाशी संबंधित, शैक्षणिक विषयांवर लिहिणारे आणि ललित साहित्य (कथा, कादंबरी, कविता, नाटक, इत्यादी) अशा तिन्ही अंगाने लेखन करणारे अनेक प्राथमिक, माध्यमिक शिक्षक महाराष्ट्रात आहेत. मराठी वाङमयाच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास असे दिसून येईल की लेखन करणारे साहित्यिक हे मुख्यत्वे शिक्षकच होते. अशा शिक्षकांनी एकत्र येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाणघेवाण करावी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून शिक्षक साहित्य संमेलन घेण्यात येते. शिक्षक साहित्य संमेलनामध्ये, शिक्षकांनी केलेले लेखन, कविता, नाटकांचे सादरीकरण होते. तसेच या व्यासपीठावर शिक्षकांच्या प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी चर्चा देखील ते सगळे मिळून करू शकतात.

दर दोन वर्षांतून एकदा साहित्य संमेलन घेण्यात येते.