शीघ्र निदान आणि उपचार या उपक्रमांतर्गत 0 ते ६ या वयोगटातील कर्णबधिर बालकांची ‘कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी’ झाल्यास त्यांची श्रवणक्षमता वाढते. या शस्त्रक्रियेमुळे बालकाची ‘भाषा आणि वाचा विकास’ होण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन लाभार्थी व शासन यांच्यामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर समन्वयक म्हणून लाभार्थ्यांची निवड करून केंद्रशासनाच्या ADIP (एडिप) योजनेअंतर्गत तसेच सीएसआर फंड यांच्या माध्यमातून सहकार्य केले जाते.