यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्ती ला सलाम करण्यासाठी यशस्विनी सन्मान पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षीच्या म्हणजेच तिसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

यशस्विनी कृषी सन्मान २०२४

कृषी क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार 'यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार' या नावाने दिला जाणार असून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकरी महिलेची यासाठी निवड करण्यात येणार आहे.

कृषी सन्मान अर्ज दाखल करा


यशस्विनी साहित्य सन्मान २०२४

साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार 'यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार' या नावाने ओळखला जाईल. साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या महिलेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.

साहित्य सन्मान अर्ज दाखल करा


यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान २०२४

क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या एका महिलेस 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्कारा'ने गौरविण्यात येईल.

क्रीडा प्रशिक्षक सन्मान अर्ज दाखल करा


यशस्विनी उद्योजिका सन्मान २०२४

औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेस 'यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्कार' देण्यात येणार आहे.

उद्योजिका सन्मान अर्ज दाखल करा


यशस्विनी सामाजिक सन्मान २०२४

सामाजिक क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करुन महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणाऱ्या महिलेस 'यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.

सामाजिक सन्मान अर्ज दाखल करा


यशस्विनी पत्रकारिता सन्मान २०२४

पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारासही 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार' देण्यात येणार आहे.

पत्रकारिता सन्मान अर्ज दाखल करा


महत्वपूर्ण वेळापत्रक

या सर्व पुरस्कारांसाठी दि. १ फेब्रुवारी पासून अर्ज मागविण्यात येणार असून याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२४ आहे.

पुरस्कारार्थींची घोषणा जून २०२४ रोजी करण्यात येणार असून देशाला पथदर्शी ठरलेले महिला धोरण महाराष्ट्रात मंजूर होण्याच्या दिवशी म्हणजे २२ जून रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप

रुपये २५ हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

अधिक माहितीसाठी:

संपर्क: 7798953631
ईमेल: हा ईमेल पत्ता स्पॅमबॉट्सपासून संरक्षित केला जात आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे.